करमाळा प्रतिनिधी
सोलापुर जिल्हयाचे राजकारणात नेहमी किंगमेकरची भुमिका बजावणारे आणि राजकीय संघर्षात स्वतःचा एक वेगळा ठसा असणारे नेतृत्व हे आ. संजयमामा शिंदे यांचे असुन, आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी मामांनी
सांगितलेले धोरण पाळणार असुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविणार असल्याचे वक्तव्य सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक तथा केत्तुरचे माजी सरपंच राजेंद्रसिंह ऊर्फ अशोकराव पाटील यांनी केले.
मागिल निवडणुकीत रणजितदादा जरी मामांचे प्रतिस्पर्धी राहीले असले तरी विकास कामांचे बाबतीत खासदारांनी नेहमी प्रोटोकॉल पाळुन या पाच वर्षात आ. संजयमामा यांना सोबत घेऊन अनेक विकासाची महत्वपुर्ण कामे मार्गी लावलेली आहेत.
करमाळा तालुक्यासह माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण-खटाव येथील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे यशस्वी काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. आज आशिया खंडातील सर्वात मोठी डिस्टलरी त्यांची असुन, त्यांचे कारखान्याने देखिल शेतकरी सभासदाला योग्य भाव दिला आहे. अडचणीच्या काळात करमाळा तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचे गाळप देखिल त्यांनी केलेले आहे. आजपर्यंतच्या खासदारांमध्ये त्यांचे काम सर्वाचे पेक्षा भारी भक्कम असुन, त्यांचे मराठीसह, हिंदी, इंग्रजी भाषांवर देखिल प्रभुत्व आहे. ते एक उच्चशिक्षित खासदार असुन, रणजितदादा आणि संजयमामांची जोडी भविष्यकाळात तालुक्याच्या विकासात भर टाकणारी आहे. देशात मोदींचेच सरकार येणार आहे हे निश्चित असुन आपणही या सरकारमध्ये राहुन आपल्या विकासकामांना चालना देणाऱ्या उमेदवाराचे पाठीशी असायला पाहीजे. आ. संजयमामा शिंदे आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांकडे या मतदार संघाचा कायापालट करण्याची धमक आहे. राज्य सरकार या दोघांचे पाठीशी खंबीर असुन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांचे पाठीशी असुन, आगामी काळ हा करमाळा तालुक्यासह माढा मतदारसंघा करीता उज्वल काळ असणार आहे. पाच वर्ष विरोधी बाकावर बसुन बोंबलत बसण्या पेक्षा आपण सत्तेत राहणारा व कार्यकुशल असणारा आपल्या हक्काचा माणुस म्हणुन निंबाळकरांना पुन्हा एकदा विजयी करावे. यावेळी माढा मतदारसंघाला संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची देखिल संधी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आ. संजयमामांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा घेतलेला निर्णय आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना शिरसावंद्य असुन, आमचा प्रत्येक कार्यकर्ता तन-मन-धनाने बहुसंख्य मताधिक्याने खासदार निंबाळकर यांना विजयी करतील. तसेच आजपर्यंत आ. संजयमामांना ज्यांनी वेळोवेळी विरोध केला आहे त्यांना अजिबात सहकार्य करू नये असे सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे.