करमाळा (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या तीन टर्ममध्ये निवडून आलेल्या शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील या दिग्गज नेत्यांनी व गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या रणजितसिंह

निंबाळकरांनी मतदारसंघाच्या विकासासाठी काय केले ? असा सवाल अपक्ष उमेदवार विनोद सितापुरे यांनी उपस्थित केला आहे व हाच प्रश्न मतदारांनी मते मागायला येणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील व

भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना विचारावा व मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन केले आहे.

    आपण कोरी पाटी असणारे उमेदवार असल्याने आपल्या उमेदवारीला मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करून पुढे बोलताना सितापुरे यांनी, या मतदार संघातील सिंचन, रस्ते, शिक्षण व रोजगाराच्या सुविधा हे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आजवर निवडून आलेल्या कुठल्याही खासदारांनी कसलेही प्रयत्न न केल्याने मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. आपण खासदार झाल्यानंतर करमाळा, मोडनिंब, सांगोला, अकलूज, माळशिरस, वेळापूर, नातेपुते, फलटण, माण-खटाव आदी प्रमुख ठिकाणी पंचतारांकित शासकीय औद्योगिक वसाहती उभ्या करून उद्योजकांना उद्योगाच्या व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, संपूर्ण मतदारसंघात सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सिंचन योजनांना मंजुरी मिळवणे, मतदार संघात सर्वत्र वैद्यकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विज्ञान, संगणक शाखांची महाविद्यालये उभी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणे, मतदार संघात हमरस्ते व रेल्वे मार्गांचे जाळे निर्माण करणे, करमाळा, माढा व फलटण येथे विमानतळांची निर्मिती करणे अशा प्रकारे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सितापुरे यांनी दिली आहे.  

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *