करमाळा प्रतिनिधी
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्रजी पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील,
प्रदेश उपाध्यक्ष माऊली भाऊ जवळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसनराव खोचरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष राजेंद्र डोके, सोलापूर जिल्हा कामगार अध्यक्ष रामेश्वर
लोंढे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस तानाजी पाटील, माढा तालुकाध्यक्ष पंडित पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष शिवाजीराव बनकर, तालुका उपाध्यक्ष अनिल तेली सर, ह.भ.प. आबासाहेब तरंगे, आजिनाथ इरकर, अजित दुधे, निलेश पडवळे, भीमराव
येडे, भागवत दुधे, भीमराव येडे, भालचंद्र इवरे, दिलीप पवार, मिलिंद भोसले, गणेश इवरे, नवनाथ कोळेकर, कल्याण कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत सर्वांची मते पंजाबराव पाटील यांनी जाणून घेतली आणि मग निर्णय घेण्यात आला धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा करमाळा शहरातील सभेमध्ये देण्यात आला. करमाळा तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना पन्नास हजाराचे लीड देण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरांमध्ये घराघरांमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करून त्यांना 50 हजाराचे मतधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला.