करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघातील अकोल्या पाणी सिंचन योजना पूर्ण करणार असल्याचे माढा लोकसभेचे अपक्ष उमेदवार विनोद सीतापुरे यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन साठी चाळीस गावातील नागरिकांनी लोकसभा मतदान आवर बहिष्कार घातला आहे तरी त्यांनी तसे करू नये. या उपसा सिंचनसाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच कुकडी व दहिगाव प्रकल्पाचेही अपुरे काम
आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात अशाच प्रकारे अनेक सिंचन योजना अपुऱ्या आहेत याबाबत सहनिशाकडून योग्य ते नियोजन करून अपुऱ्या पाण्याच्या योजना पूर्ण करणार आहे असे अपक्ष उमेदवार विनोद सीतापुरे यांनी सांगितले आहे.