करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचा पाठिंबा आज देण्यात आला आहे.
करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी, माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमीर तांबोळी आदी मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शरदचंद्र पवार
यांच्या उपस्थितीत विजयसिंह मोहिते पाटील,माजी आमदार नारायण पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम संघटनेच्या वतीने तांबोळी यांनी मोठा पुष्पहार पवार यांना घालून पाठिंबा जाहीर केला आहे.