करमाळा प्रतिनिधी
करमाळ्याचे भाजपचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांनी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. माजी
आमदार जगताप भाजपचे उमेदवार खा. रणजीतसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार करमाळा दौऱ्यावर आले असता सर्वप्रथम
त्यांनी बाजार समितीच्या प्रांगणातील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तद्नंतर त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. यावेळी जगताप यांनी खा. पवार यांचा यथोचित सत्कार केला. यापूर्वी जगताप
यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांनी जगताप भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांचे चहापान झाले. सन २००९ साली लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी दस्तरखुद्द पवार यांच्या विरोधात भूमिका घेत सुभाष देशमुख यांचा प्रचार केला होता. माजी आ. जगताप यांनी गेली कित्येक वर्ष सातत्याने भाजप समर्थनाची भूमिका घेतली आहे. तरीदेखील खा. पवार व विजयदादा यांनी जगताप यांची घेतलेली भेट राजकीय दृष्टया अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप उपस्थित होते.