करमाळा प्रतिनिधी
आ. संजयमामा शिंदे, रश्मी दिगंबरराव बागल व गणेश चिवटे यांच्यामुळे वाशिंबेत विविध विकास कामांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे तर अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे वाशिंबे गावातून भरघोस मताधिक्य देण्याचा
निर्धार वाशिंबे येथील शिंदे व बागल समर्थकांनी केला आहे. वाशिंबे गावातील मागील अनेक वर्षांपासून रखडलेला वाशिंबे-टापरे चौफूला ते राजूरी रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झाला आहे. तसेच वाशिंबे ते पेट्रोल पंप चौक ते राजूरी हा रस्ता
रुंदीकरण व डांबरीकरणा साठी ११ कोटीची तरतूद करण्यात आली असून या कामाचे टेंडर ही निघाले आहे. तलाठी कार्यालय इमारत, बापू बोबडे वस्ती ते संजय गायकवाड वस्ती रस्ता, भैरवनाथ मंदीर रस्ता, रामचंद्र पाटील वस्ती रस्ता, भैरवनाथ
मंदीर अंगणवाडी इमारत, मुस्लीम समाज सभागृह, महादेव मंदीर सभागृह, भैरवनाथ मंदीर सभागृह, पेव्हींग ब्लाँक, आदर्श जिल्हा परिषद शाळा, जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना, आरो प्लँट, सीसीटीव्ही अशी विविध कामे मार्गी लागली आहेत.
तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिगंबरराव बागल यांच्या प्रयत्नातून जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी सहा कोटी हून अधिक निधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक रुग्णावर मोफत उपचार केले जाणार असून येथील मेडीकल स्टोअर मधून औषध गोळ्यांचे वितरण मोफत होणार आहे. तसेच महीलांची प्रसुती ही विना शुल्क होणार आहे. आरोग्य केंद्रात सर्व सुविधा असलेली अँम्बुलंस कायमस्वरूपी असणार आहे. तसेच तत्कालीन आमदार शामलताई बागल यांच्या कार्यकाळात वाशिंबेत ३३/११ Kv सबस्टेशनला मंजूरी मिळून काम पूर्ण झाले.
तसेच गणेश चिवटे यांच्या प्रयत्नातुन दलित वस्ती सुधारणा यासाठी पेव्हींग ब्लॉक बसवण्यासाठी सात लाख व वाशिंबे सोगाव म्हसोबा मंदिर शिव रस्त्यासाठी तीन लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. टापरे चौक, पद्मावती मंदिर, तात्यासाहेब झोळ वस्ती येथे स्टेट लाईट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाशिंबे गावातून ८०% मतदान करणार असल्याचा निर्धार वाशिंबे येथील ग्रामस्थांनी केला आहे.