करमाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या वतीने अपेक्स किडनी सेंटर यांच्या माध्यमातून करमाळा येथे मोफत डायलिसिस सेंटरची सुरुवात झाली असून उत्तम पायघन वय 71 राहणार शेलगाव (क) या रुग्णावर पहिली मोफत डायलिसिस प्रक्रिया करण्यात आली.
खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या डायलिसिस सेंटरची उभारणी केली आहे.
या ठिकाणी दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हे हॉस्पिटल समाविष्ट करून मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या डायलिसिस सेवेचा फायदा करमाळा, जामखेड, कर्जत, परांडा, माढा या भागातील हजारो रुग्णांना होणार आहे
……………….
उत्तम पायघन
मी करमाळा तालुक्यातील शेलगाव क येथील शेतकरी असून करमाळा शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर सुरू झाल्यामुळे मला फार मोठा आधार मिळाला आहे. दर चार दिवसाला मला डायलिसिस प्रक्रिया करावी लागते. मला जीवनदान देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
………………
मंगेश चिवटे (कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष)
करमाळा तालुक्यातील किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना डायलिसिस साठी नगर, पुणे, सोलापूर या ठिकाणी जावे लागत होते. करमाळा तालुक्यात जवळपास सातशे रुग्णांना डायलिसिस प्रक्रिया गरजेची आहे. ही बाब आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाला मदत करून ही सेवा करमाळा तालुक्यातील रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
………………..
महेश चिवटे (अध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल करमाळा)
करमाळा तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी करमाळ्यात ब्लड बँक सुरू केली असून आता डायलिसिस सेंटर सुरू केले आहेत. भावी काळात एक दर्जेदार हॉस्पिटल उभा करून सर्व रुग्णांना माफक दरात शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
मोफत डायलिसिस प्रक्रिया करून घेण्यासाठी रुग्णांनी आरोग्य सेवक गणेश मुळे 8655701517 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आव्हान डायलिसिस सेंटरचे उपाध्यक्ष दीपक पाटणे यांनी केले आहे.