करमाळा प्रतिनिधी
करमाळयात शिवसैनिकांची ताकद मोठ्याप्रमाणात असून प्रामाणीक पणे काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठिशी खंबीर पणे उभा असून निष्ठावंत शिवसैनिकांचा स्वाभिमान गहाण पडू देणार असा विश्वास सह संपर्क प्रमुख साईनाथ अंभगराव यांनी शिवसैनिकांना दिला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील गुरूप्रसाद मंगल कार्यालय येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळेस साईनाथ अंभगराव बोलत होते.
व्यासपीठावर माळशिरस येथील जिल्हापरिषद सदस्य दत्तात्रय तोडकर, तालुका संघटक प्रवीण कटायीया, शिव-भिम आर्मीचे शहाजीराव धेंडे, शहरप्रमुख संजय शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, बंडू
शिंदे, ॲड. विकास जरांडे, प्रमोद वागज, केम शहरप्रमुख सतीश खानट, उपशहरप्रमुख संतोष गनबोटे, पंकज परदेशी, युवासेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर, सचिव आदेश बागल, शहरप्रमुख समीर हलवाई, युवासेना उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे,
अभिषेक मोरे, केम महिला आघाडी शहर प्रमुख आशाताई मोरे, युवती सेना शहरप्रमुख गौरी मोरे, विभाग प्रमुख सोमनाथ पोळ, मयुर तावरे, शाखाप्रमुख ओंकार कोठारे, पोटेगावचे शाखा प्रमुख सरपंच अदिनाथ भागडे, पिंपळवाडी माजी सरपंच, मधू
आबा काळे, शाखा प्रमुख गोरख मासाळ, विभाग प्रमुख अविनाश गाडे, उमरड शाखा प्रमुख शंकर बदे, बोरगाव शाखाप्रमुख विष्णू शिंदे, विभाग प्रमुख बालाजी वाडेकर, पार्थुर्डी शाखा प्रमुख नाना मोटे, पारेवाडी शाखा प्रमुख बाळासाहेब पवार, भाऊराव मस्तूद, लालू कुरेशी उपस्थित होते.
अधिक बोलताना अंभगराव म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्याना जागा दाखवण्यासाठी हेवेदेवे बाजूला ठेवून एकदिलाने कामाला लागा.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदा दादा फरतडे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत शिवसैनिकांनी अनेकांना खासदार-आमदार केले परंतु निष्ठावंत शिवसैनिकांचा या लोकांनी पंचायत समीती, जिल्हापरिषदेसाठी कधीही विचार केला नाही, विकास निधी शासकीय कमिटी वाटपात दुजाभाव केला भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराच फरतडे यांनी दिला. आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देणार असून पुन्हा एकदा तालुका भगवामय करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ताकद उभा करू असा शब्द दिला.
तालुका संघटक प्रवीण कटारीया म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरे यांचा आदेशानुसार महाविकास आघाडीचे काम करणार आहे, मात्र मित्र पक्षाकडून देखील युती धर्म पाळला गेला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत देखील शिवसैनिकांना विश्वासात घेऊन वाटचाल केली पाहिजे असे सांगीतले. उपतालुकाप्रमुख बंडू शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, आदेश बागल यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले.
कार्यकम यशस्वी करण्यासाठी युवासेना शाखा प्रमुख ओंकार कोठारे, विशाल नवगन, अनिकेत नवगन, रोहन परदेशी, तुषार सावंत, योगेश नगरे, नवनाथ फरतडे, विनोद पाटील, बिरू ठोंबरे, मोतीराम फरतडे, सुरज पुजारी, पप्पू निकम, मालोजी खाटमोडे, बालाजी फरतडे, आदींनी परिश्रम घेतले.