सोलापूर प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषगाने सोलापूर जिल्ह्यातील 43 माढा या लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया दि 12/04/2024 पासून सुरु झाली आहे. त्यानुसार दि 12/04/2024 ते 19/04/2024 या नामनिर्देशन स्वीकारण्याच्या कालावधीत 43 माढा लोकसभा मतदार संघाकरिता एकूण 42 उमेदवारांनी 55 नाम निर्देशनपत्रे दाखल केलेली होती.
मा. भारत निवडणूक आयोगाकडील कार्यक्रमानुसार दि 20/04/2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करणेत येवून, छाननी दरम्यान 38 उमेदवारांचे 47 नाम निर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आले. तसेच 4 उमेदवारांची 8 नाम निर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली. उमेदवारी अर्ज माघारी घेणेकरिता मा. आयोगाने दिलेल्या कालावधीत दि 22/04/2024 पर्यंत एकूण 06 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
छाननी अंती व माघारी अंती 43 माढा लोकसभा मतदार संघाचे सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिमत: 32 इतके उमेदवार निवडणूक लढविणार असून त्यांची यादी (7A नुसार) सोबत जोडली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता दि 16 मार्च, 2024 पासून लागू झाली असून त्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी आचारसंहितेच्या अनुषगाने “DO’s and Don’t” ची यादी पुरविण्यात येवून एक खिडकी कक्षातून आवश्यक त्या परवानगी घेणेबाबत माहिती देणेत आली आहे. सर्वाना राजकीय पक्ष व उमेदवार यांचे खर्चाचे अनुषगाने खर्च समितीने निश्चित केलेली दरसूची देखील पुराविणेत आली आहे.
43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान करणाऱ्या मतदारांची एकूण संख्या 1996100 इतकी असून त्यापैकी पुरुष मतदार 1035678, स्त्री मतदार 955706 व इतर मतदार 70 इतकी आहे तसेच 4938 सैनिक मतदार आहेत आणि परदेशस्थित भारतीय नागरीक (Overseas Voter ) 8 मतदार आहेत.
43 माढा मतदार संघामध्ये एकूण मुळ मतदान केंद्र 2029 असून 1 सहाय्यकारी केंद्र अशी एकूण 2030 मतदान केंद्रे आहेत त्यापैकी (शहरी 252 व ग्रामीण 1772 ) तसेच एकूण 18 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या लोकसभा मतदार संघातील 1027 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. तसेच, 10- युवा संचलित मतदान केंद्रे, 12 – महिला संचलित मतदान केंद्रे, 06- दिव्यांग संचलित मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.
तसेच 43 माढा मतदार संघामध्ये 85 वर्षावरील 32144, दिव्यांग मतदार 14232 व अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी कर्मचारी 366 अश्या एकूण 46742 मतदारांना १२D अर्जाचे वाटप करण्यात आले होते, त्यापैकी 85 वर्षावरील 1652, दिव्यांग मतदार 212 व अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी कर्मचारी 362 व EDC यांच्याकरिता 6950 इतक्या मतदारांनी पोस्टल मतदान / गृहमतदानाकरिता 12D अर्ज भरून सादर केले आहेत.
43- माढा लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण 8019 BU, 2673 CU व 2837 VVPAT इतक्या EVM चे वाटप मतदार संघ निहाय करून त्या पोलीस बंदोबस्तात Strong room मध्ये ठेवण्यात आले आहेत. 43 माढा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता 25 – SST (स्थिर सर्वेक्षण पथके), 27 – FST (भरारी पथके), 26 VST, 236- Sector Officer ( क्षेत्रीय अधिकारी) कार्यरत असून मतदान प्रक्रियेकरिता मतदान केंद्रावर एकूण 11505 मतदान अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आली आहे. आचार संहिते बाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यासाठी C- Vigil app उपलब्ध करून देणेत आले आहे. तसेच cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी एक control room स्थापन करण्यात आली असून तिथे 1950 हा toll free नंबर हा activate करण्यात आला असून सदर control room मधून सर्व पथकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
लोकसभा 2024 सार्वत्रिक निवडणूक यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापन करणेत आला असून व Suvidha प्रणालीद्वारे उमेदवार / पक्ष प्रतिनिधी यांना परवानगीकरिता अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे.