करमाळा प्रतिनिधी
गटबाजीला कंटाळून भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदाचा चंद्रकांत राखुंडे यांनी राजीनामा दिला. चंद्रकांत राखुंडे हे भाजपामध्ये २००८ ते २०२४ पर्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्ष यांना वारंवार सांगूनही गटबाजी होत आहे ह्यालाच कंटाळून राजीनामा देत असल्याचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांना पत्र दिले आहे.