सोलापूर दि.19 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडुन जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून रूपाली ठाकूर (भा.प्र.से ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनरल निवडणूक निरीक्षक रूपाली ठाकूर (भा.प्र.से ) यांचे कार्यालय चित्रा शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून, निवडणूकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे अथवा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सामान्य निवडणूक निरीक्षक हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर नसताना सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत चित्रा , शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोालापूर येथे भेटीसाठी उपलब्ध होतील . तसेच त्यांचा संपर्क क्रमांक 8468963418 हा असून सदर क्रमांकावर भ्रमणध्वनी अथवा व्हॉटसअपवर संदेशाव्दारे संपर्क साधता येईल. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कळविले आहे.