करमाळा प्रतिनिधी
28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींचे भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करेपाटील यांनी केले. उद्घाटनपर भाषणात करेपाटील सर म्हणाले नगर परिषदेच्या
शाळेतून जिल्ह्यात सर्वात जास्त पट संख्या असलेली या मुलींची शाळेने विज्ञान प्रदर्शनात अंतराळवीरांच्या वेशभूषेत असलेल्या पूर्वा घोलप,समीक्षा शिंदे या मुली, चंद्रयान 3, प्रतिकृती,स्टेजवर स्पेसथीम व छोट्या बाल वैज्ञानिक मुलींनी बनवलेले वेगवेगळे विज्ञान मॉडेल, प्रयोग सर्व भव्यदिव्य व आकर्षक विज्ञान प्रदर्शन हे या शाळेतील मुलींना कल्पना चावला,
सुनिता विल्यम्स सारख्या अंतराळवीर होण्यास प्रेरक ठरेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे म्हणाले की, शाळेने विज्ञान प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्या कल्पनाशक्तीला, क्रिएटिव्हीटीला वाव दिला. त्याबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांनी प्रास्ताविकपर भाषणात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या जीवनप्रसंगातील किस्से सांगून विद्यार्थी व पालकांना वैज्ञानिकांची जीवनचरित्रे
वाचावी असे आवाहन केले. पालकांमधून माधुरी पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात 300 मुलींनी सहभाग घेतला. प्रदर्शनास जवळपास 500 पालकांनी भेट दिली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमृतसिंग परदेशी, उपअध्यक्षा भाग्यश्री फंड, सामाजिक कार्यकर्ते अरुण टांगडे, वरिष्ठ लिपिक देविदास कोकाटे, सूरज आवटे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मोनिका चौधरी यांनी मानले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक भालचंद्र निमगिरे,सुवर्णा वेळापूरे, सुनिता क्षिरसागर, रमेश नामदे,
तृप्ती बेडकुते, निलेश धर्माधिकारी, भाग्यश्री पिसे यांनी परिश्रम घेतले.