करमाळा प्रतिनिधी
नगरपरिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेचे क्रीडा स्पर्धेतील विविध खेळातील यश तब्बल 11 स्पर्धा मधून 13 बक्षिसे वैयक्तिक स्पर्धेतील मिळवणारी शाळा ठरली सर्वात जास्त बक्षिसे मिळवणारी शाळा नगरपरिषद शिक्षण
मंडळ करमाळा आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सव 2023 -24 हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत अतिशय उत्साहात संपन्न झाला. यामध्ये करमाळा शहरातील नगरपरिषदेतील सर्व शाळेमधील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात भाग घेतला होता
शहरातील नगरपरिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेने विविध स्पर्धेमध्ये भरघोस असे यश मिळवले आहे त्यात लहान गट मुले इयत्ता दुसरीचा श्लोक क्षीरसागर 50 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक, लहान गट मुली हर्षदा
तानाजी गायकवाड 50 मीटर धावणे प्रथम क्रमांक, मोठा गट मुली इयत्ता चौथी श्रावणी पांडुरंग शिंदे धावणे 100 मीटर प्रथम क्रमांक, मोठा गट मुली इयत्ता चौथी दुर्वा सोमनाथ शिंदे धावणे 100 मीटर तृतीय क्रमांक, मोठा मुली गट इयत्ता तिसरी
संगीत खुर्ची मनीषा मिलिंद माने द्वितीय क्रमांक, लहान गट मुली इयत्ता दुसरी संगीत खुर्ची आराध्या सुरेंद्र बोकण प्रथम क्रमांक, लहान गट मुली लिंबू चमचा स्पर्धेत इयत्ता दुसरी स्वरांजली राजू वाघमारे द्वितीय क्रमांक, मोठा गट मुले लिंबू
चमचा स्पर्धेत सिद्धी गणेश भुसारे इयत्ता चौथी प्रथम क्रमांक, मोठा गट मुली लिंबू चमचा स्पर्धेत शिवांजली राजू वाघमारे इयत्ता चौथी द्वितीय क्रमांक, मोठा गट मुले तीन पायाची शर्यत युवराज सतीश फंड व शौर्य खाडे इयत्ता चौथी प्रथम क्रमांक,
मोठा गट तीन पायाची शर्यत इयत्ता चौथी वेदांत रामदास फंड व तेजस पवार तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. प्रशालेतील विद्यार्थी नेहमीच विविध स्पर्धेमध्ये आघाडीवर असतात. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकांकडून कौतुक होत आहे. तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा थीम वापरून अतिशय सुंदर व दिमाखदार असे क्रीडा संचलन केले. त्याबद्दल क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटक तहसीलदार शिल्पा ठोकडे , गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, प्रशासन अधिकारी अनिलजी बनसोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर यांच्या हस्ते झाला. त्यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व कौतुकाची थाप दिली. क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला सतीश टांगडे, शिक्षक मुकुंद मुसळे, संतोष माने सर, बाळासाहेब दुधे सर, आसराबाई भोसले या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेते खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल दगडे, उपाध्यक्ष राणी बोरा मॅडम, शिक्षण तज्ञ अंजली श्रीवास्तव मॅडम व समितीतील सर्व सदस्य यांनी कौतुक केले व पुढील प्रकाशमान वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.