करमाळा प्रतिनिधी
सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) च्या निवडी संपन्न झाल्या असून यामध्ये युवक नेते अशपाक जमादार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तसेच बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे नेते करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक आबा सांळुके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्र देण्यात आले.
या निवडी नंतर बोलताना जमादार यांनी सांगितले की, पक्षाने मोठ्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, मी ही जबाबदारी कर्तुत्व निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचें विचार मी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करेन असे जमादार यांनी सांगितले.
यावेळी माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर, पंढरपूर तालुक्याचे नेते कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष बाळूमामा बंडगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड व जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.