करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप करून अद्यापही शेतकरी सभासदाला बिल न मिळाल्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून ऊस बिल तात्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
प्राध्यापक रामदास झोळसर, शेतकरी कामगाराचे नेते दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश वाळुंजकर यांनी दिला आहे. याबाबतचे ऊस बिल मागणी निवेदन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना
देण्यात आले आहे. सदर निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आदिनाथ सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम 2023-24 मध्ये आम्ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिलेला होता. सदर गाळप झालेल्या उसाचे
बिल अद्याप आम्हाला मिळाले नाही. सध्या कारखाना बंद झाला असून साखर मॉलिसीस पदार्थ यांची विक्री प्रोसेस सध्या चालू आहे. या विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून सर्वप्रथम आम्हा शेतकऱ्याचे देणे असलेले बिल आम्हा सर्वप्रथम प्राधान्याने
देण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली असून सदर मागणीला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मान्य करत आदिनाथ सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यांना सदर बिल देण्याविषयीचे आदेश तहसील कार्यालयाचे पत्र दिले असून
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची साखर माॅलिसिस पदार्थ विक्री झाल्यानंतर रामदास झोळसर व त्यांच्या सहकारी शेतकऱ्याची तात्काळ बिल देण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना दिलेल्या निवेदनानुसार
योग्य ते कार्यवाही प्रशासनाकडून झाली असून याची आदिनाथ सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक व प्रशासक यांनी दखल घेऊन आम्हाला ऊस बिल न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक रामदास झोळ सर व त्यांचे सहकारी शेतकरी सभासद यांनी दिला आहे.