करमाळा प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यात उपअभियंता गायकवाड बी.एच. हे ठेकेदारांना छळून छळून पैसे गोळा करत आहेत. करमाळा तालुक्यात वर्षभरात साधारणपणे सर्व योजनांमधून अंदाजे शंभर कोटी रुपयांच्या आसपास निधी येतो. उपअभियंता गायकवाड बी.एच. हे या निधीतून प्रत्येक कामासाठी १ टक्के घेतात म्हणजे वर्षभरात जवळपास एक कोटी रुपये टक्केवारीतून मिळवतात. तसेच तालुक्यातील १९ गावे त्यांच्याकडे स्थापत्य अभियंता या पोस्ट साठी असल्यामुळे ती ५७ गावे देखरेखी खाली आहेत. या वीस गावांच्या कामाचे ३ टक्के ते कमिशन पोटी घेतात म्हणजे साधारण १ कोटी ७१ लाख होतात. म्हणजे उपअभियंता या पदाचे १ कोटी आणि स्थापत्य अभियंता या पदाचे १ कोटी ७१ लाख लाख असे मिळून २ कोटी ७१ लाख होतात.
त्यामुळे करमाळा तालुक्यातील कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. ठेकेदार आणि सरपंच हेलपाटे मारतात तेव्हा गायकवाड शुगर आणि बीपी चा त्रास आहे. म्हणून काम लांबनीवर टाकतात. परंतु टक्केवारी दिली की काम करतात अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्याकडील भ्रष्टाचाराची रक्कम शासनाने वसूल करून करमाळ्यातील शेतकऱ्यांना ठेकेदारांना व सरपंचांना न्याय द्यावा अन्यथा दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागीय आयुक्त सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे पैसे वाटप आंदोलन केले जाईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे एका निवेदनद्वारे दिला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले की, अधिकारी हार्दिक शासनाचा कर्मचारी व जनतेचा सेवक असतो. त्यासाठी जनतेच्या पैशातून शासनाकडून गलेलठ्ठ पगार मिळतो. असे असताना देखील हे महाशय टक्केवारी ला चांगलेच सोकाळले आहेत. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संपत्ती ची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा जनशक्ती संघटना शेकडो सरपंच व ठेकेदारांना घेवून पैसे वाटप आंदोलन करेल.
याप्रसंगी गणेश वायभासे, विठ्ठल मस्के, अतुल राऊत, बिभीषण शिरसाट, शरद एकाड, दिपाली डिरे, पांडू भोसले, बालाजी तरंगे, औदुंबर सावंत, रेश्मा राऊत, राणा वाघमारे, किशोर शिंदे, रामराजे डोलारे, बंडू शिंदे, अभी नवले, आदी उपस्थित होते.