जेऊर प्रतिनिधी 

रसायन शास्त्रज्ञ ऐश्वर्या म्हेत्रे हीचा माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे यांची कन्या हीची नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,

महानिर्मिती, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई येथे रसायन शास्त्रज्ञ वर्ग एक या पदावर नियुक्ती करण्यात आली. तिने या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल जेऊर येथील ग्रामपंचायत आणि आमदार

कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गदिया, सचिव प्रा. अर्जुनराव सरक, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, कुमारी ऐश्वर्या हीचे वडील

मनोजकुमार म्हेत्रे, मातोश्री संगीता म्हेत्रे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, ग्रामविकास अधिकारी अंगद माने, सूर्यकांत पाटील सर, नाना मोटे आदी उपस्थित होते. कुमारी ऐश्वर्या हिने रसायन शास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून

गेट सेट परीक्षा उत्तीर्ण आहे. सध्या ती नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये कार्यरत असून तिने पीएचडी प्राप्त केली आहे. तिच्या या यशाबद्दल शुभेच्छा देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी देशाच्या विकासात शास्त्रज्ञांचं योगदान महत्वाचे असून तुमच्या हातून जनहित व राष्ट्रहित साधणारे अनेक शोध यशस्वीपणे लागो अशा शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *