करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपरिषदेने ठेकेदार दिग्विजय देशमुख यांना दिलेल्या प्रभाग क्रमांक एक मधील संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे या न केलेल्या कामाची चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे केली आहे.

         सदर जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषदेने शासनाच्या नगरोत्थान योजनेतुन जुन २०२१ रोजी प्रभाग क्रमांक एक मधील संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे हे काम विशेष सभेत मंजूर केले होते तर तांत्रिक मान्यता ऑगस्ट महिन्यात घेतली होती तसेच प्रशासकीय मान्यता सप्टेंबर २०२१ रोजी

घेऊन ३०/०९/२०२१ रोजी दैनिक लोकमत मध्ये कामाची निविदाचे जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आले. त्यानुसार संपूर्ण टेंडर ची प्रक्रिया पूर्ण होऊन दिग्विजय दिगंबर देशमुख या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. परंतु सदर ठेकेदाराचे टेंडर हे अंदाजपत्रकीय रक्कमे पेक्षा ९:९ टक्के जादा दर आल्याने नगरपालिकेने तडजोड करून 5 टक्के जादा दराने सदर ठेकेदाराला

काम देण्यात आले होते व त्यानुसार सदर ठेकेदाराला 1 नोव्हेंबर 2021 रोजी जावक क्रमांक बा वि/ सा शा/ १०९९/२०२१ रोजी कार्यारंभ आदेश दिला व तात्काळ करारपत्र करून घ्यावे असे पत्राद्वारे कळविले होते. परंतु कार्यारंभ आदेश घेतल्यानंतर सदर ठेकेदाराने आज पर्यंत कोणतेही काम केलेले नाही. सदर ठेकेदाराला नगरपरिषदेने आज पर्यंत एकही नोटीस बजावली नाही

किंवा कोणताही दंड ठोठावला नाही. या ठेकेदारावर आज पर्यंत का कार्यवाही करण्यात आलेली नाही यांच गौडबंगाल अद्याप पर्यंत उघडकीस आलेले नाही. सदर रस्ता डांबरीकरण न करता बील काढण्याचा संशय येत आहे. कारण गेली दोन वर्षे मुख्याधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केलेली दिसुन येत नाही. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. शासनाचा निधी गेली दोन वर्षे पडून राहिला आहे. सदर कामाअभावी सदर रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे किरकोळ अपघात होत आहेत. तरी नगरपरिषदेस वेठीस धरणाऱ्या ठेकेदार व त्याला सहकार्य करणारे नगरपरिषदेच्या अधिकारी ची चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जमादार यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *