करमाळा प्रतिनिधी
करमाळ्यातील स्वच्छता करण्यासाठी करमाळा नगरपालिका दर महिन्याला 13 लाख रुपये खर्च करते. शिवाय नियमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचे काम केले जाते. तरी
सुद्धा करमाळा शहर अस्वच्छतेचे माहेरघर झाले असून तुंबलेल्या गटारी रस्त्यांनी पडलेले कचऱ्याचे मोठे मोठे बिगारी त्यात फिरणारी मोकाट जनावरे, डुकरे, मोकाट गुरे, मोकाट कुत्रे यामुळे करमाळ्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून
नगरपालिका प्रशासन मृत अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
करमाळा नगरपालिकेत सध्या प्रशासकीय कारभार असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून जनतेला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे जनतेला प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वच्छता कामगार कागदावर किती व प्रत्यक्षात कामाला किती हा मोठा प्रश्न आहे.
या स्वच्छतेच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार सध्या करमाळा चर्चेचा विषय आहे.
अधिकारी बालाजी लोंढे कधीही शहरात फिरून स्वच्छतेचे पाहणी करताना दिसून येत नाहीत.
मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात असलेला ठेकेदारांचा वावर संशयास्पद असून सध्या काही चाललेले कामात प्रचंड अनिमित्तता आहे.
शहरातील कामापेक्षा या कामातून मिळणाऱ्या कामाकडे जास्त लक्ष अधिकारी देत असल्यामुळे करमाळा नगरपालिका म्हणजे आंधळं दळतं कुत्र पीठ खाते असा प्रकार झाला आहे.
अधिकाऱ्यांचे नातेवाईकच ठेकेदार झाल्यामुळे भ्रष्टाचाराला पाय फुटू लागले आहेत.
करमाळा शहरातील रस्त्याच्या व फ्लेवरिंग ब्लॉकच्या कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केल्या मात्र आम्ही तक्रारी केल्यानंतर आमच्यावर काही लोकांकडून दमदाटी करून तक्रारी मागे घेण्यास लावतात. असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी शहरप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी केला आहे.
सुमंत नगर मधील एका नागरिकांनी गटारीतील पाणी आपल्या घरात येत आहे अशी तक्रार केल्यानंतर या तक्रार करत्याला गोरगरिबाला तुझे घर अतिक्रमणात आहे ते काढून टाक अशी नोटीस देण्यात आली आहे. या पद्धतीने दमदाटी करून तक्रार करत्याला हुसकून लावले जात आहे.