
तरटगाव,बाळेवाडी,आळजापूर परिसरात बिबट्या आहे वन खात्याने त्याचा बंदोबस्त करावा-सरपंच पाटील
करमाळा प्रतिनिधी
तरटगाव,बाळेवाडी,आळजापूर परिसरात बिबट्याने हायदोस घातला आहे त्याचा बंदोबस्त वन खात्याने करावा अशी माहिती तरटगावचे उपसरपंच अभिजीत पाटील यांनी दिली आहे

उपसरपंच पाटील म्हणाले की, गेले कित्येक दिवस झाले आहे या भागातील शेतकऱ्यांना रानात जाता येत नाही,शेतीचे कामे करता येत नाही,भीतीपोटी गावाच्या परिसरातून शेताकडे फिरता येत नाही. अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे वन विभाग मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे असे त्यांनी करू नये ताबडतोब मोठ्या प्रमाणात या भागात अधिकारी पाठवावे पिंजरे लावावे त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा मोठे जन आंदोलन उभा करावे लागेल असा इशारा तरटगावचे उपसरपंच अभिजीत पाटील यांनी दिला आहे