मांगी तलाव कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात,हे शासकीय स्तरावरील मोठं यश खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेमुळे :गणेश चिवटे*
करमाळा :- मांगी तलाव कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची व खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेमुळे हे मोठं यश आल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर DPDC सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की, माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांगी तलाव कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची मागणी केली होती.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांगी तलाव कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची शिफारस केली आहे.त्यावर कुकडी प्रकल्प व कृष्णा खोरे महामंडळाने काम सुरु केले असून केंद्र सरकारच्या WAPCOS या संस्थेला सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यासाठी राज्य सरकारने ३.२१ कोटी रुपयाचा निधी मंजूर करणार आहे.यामुळे मांगी तलाव कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून,हे शासकीय स्तरावरील मोठं यश मिळाले आहे असे गणेश चिवटे यांनी सांगितले आहे.
मे महिन्यात मांगी
पाणी प्रश्न भाजपचे गणेश चिवटे यांचेकडे मांडला लगेच जून मध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आम्हा शेतकऱ्यासोबत मिटिंग घेऊन यासंदर्भात कुकडीला पत्र दिले.जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समावेश करा म्हणून शिफारस केली.ऑगष्ट मध्ये फेरजलनियोजन फाईल तयार होऊन केंद्र सरकारच्या संस्थेला अहवालाचे काम देण्यात आले.या संस्थेच बजेट आता प्राप्त झाले आहे.अगदी तीन महिन्यात गेल्या कित्तेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागल्याने भाजपच्या गतिमान शासनाचा अनुभव आला.यामुळे आमच्या भागातील लोकात आनंदाचे वातावरण आहे.
@नितिन झिंजाडे