करमाळा प्रतिनिधी
दि करमाळा अर्बन को-ऑप. बॅक लि. करमाळा या बॅकेची ७८ वी वार्षिक सर्व साधारण सभा प्रशासक दिलीप तिजोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बॅकेचे माजी चेअरमन कन्हैयालाल देवी, करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, नगरसेवक संजय सावंत, माजी उपाध्यक्ष महादेव फंड, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशोक नरसाळे, आदी सभासद उपस्थित होते.
सभेचे वाचन बॅकेचे माजी व्यवस्थापक विनायक चिवटे यांनी केले. असुन सर्व विषय मंजूर एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी बॅकेचे सभासद फारुक जमादार यांनी करमाळा अर्बन बॅकेच्या कर्मचारी चा मेडीक्लेम करण्यात यावा तसेच बाळासाहेब कर्चे यांनी ही प्रश्न विचारले.
वार्षिक सर्व साधारण सभेचे आभार व्यवस्थापक प्रकाश क्षीरसागर यांनी मानले. यावेळी बॅकेचे कर्मचारी दिपक ओहोळ, अरुण माने, अमर करंडे, स्वाती फंड, साबीर ताबोंळी, राजु साळी, वाहीद झारेकरी आदी जण उपस्थित होते.