
करमाळा प्रतिनिधी
दि.30/09/2023 रोजी मौजे सरपडोह येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पीक प्रात्यक्षिक ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले. या वेळी 100 लाभार्थीना गावचे सरपंच, उपसरपंच तसेच प्रगतशील शेतकरी यांचे हस्ते बियाणे वाटप करण्यात आले.

पाऊस जरी मोठा झाला नसला तरी पेरणी होण्याकरता जमिनीमध्ये ओलावा तयार झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून मोठ्याप्रमाणात बियाणे मागणी होती. यावेळी तालुक्यात सर्वात अगोदर वेळेवर व मुबलक प्रमाणात सरपडोह गावात बियाणे वाटप करण्यात आल्यामुळे उपसरपंच नाथराव रंदवे सर यांनी समाधान व्यक्त केले व कृषी विभागाचे आभार मानले. यावेळी गावचे कृषी सहाय्यक सचिन सरडे, कृषी सहाय्यक बाबुराव बेरे यांचे सहकार्य लाभले. सरडे यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे सर्व शेतकरी बांधवांना अहवान केले.

