शासकीय नोकरभरतीला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध – विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड नितिन खटके

प्रतिनिधी जेऊर, करमाळा

शासकीय नोकरभरतीला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध,

नितिन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड

मराठा समाज ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण मागत असुन मनोज जरांगे पाटिल यांच्या उपोषण आंदोलन मुळे मराठा पुन्हा एकदा पेटुन उठला आहे. जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी एक महिन्याची मुदत घेऊन सरकार आरक्षण बाबत संवेदनशील आहे. असं वाटत असतानाच मराठा समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे कारनामे काही थांबलेले नाहीत.

सगळेच जाणतो की सध्या मनोज जरांगे यांचे ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक मराठा आरक्षण या मागणीबाबत महिनाभरात सरकार कडुन काय तो सकारात्मक निर्णय लागेल अशी आशा आहे.

पण याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने ६०,००० शासकीय पदासाठी नोकरभरती काढली आहे. आपण सगळेच जाणतो की खुल्या वर्गातील जास्त मेरीटमुळे शासकीय नोकरीत मराठा टक्केवारी कमी होत चालली आहे आणि शासकीय नोकरीत मराठा नगण्य होत चालला आहे. एकीकडे जरांगे यांना उपोषण आंदोलन पासुन परावृत्त करायचे, वेळ मारुन न्यायची आणि दुसरीकडे शासकीय नोकरभरती करून मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा असा विचित्र प्रकार सरकार करत आहे.

समजा सुदैवाने एक महिना नंतर समाजाच्या दबावामुळे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तरी ही नोकरभरती त्या आधीच संपलेली असणार. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ” शासनाने किमान एक महिना ही शासकीय नोकरभरती थांबवावी” अशी मागणी सकल मराठा समाजामार्फत आम्ही करत आहोत, सरकारने या मागणीची गंभीर दखल घ्यावी अन्यथा मराठा समाज नोकरभरती होऊ देणार नाही आणि होणा-या परिणामांची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल..

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *