
राजुरी वीज उपकेंद्र उभारणीला आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे निधी उपलब्ध : डॉ.अमोल दुरंदे (प्रथम लोकनियुक्त सरपंच)
करमाळा प्रतिनिधी
राजुरी गावातील सामान्य नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडवण्यासाठी बऱ्याच वर्षापासून शेती वीजपंपासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राजुरी गावासाठी विजेची वाढती मागणी लक्षात घेता राजुरी गावासाठी स्वतंत्र ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र निर्मितीचा संकल्प राजुरीचे ग्रामदैवत श्री.बाळनाथ स्वामी महाराजांच्या मंदिरात आ. संजय मामा शिंदे यांच्या हस्ते पूजा करून सोडण्यात आला होता .यानंतर श्री. संत सावता माळी मंदिर परिसरात झालेल्या जाहीर सभेत आ. संजय मामा शिंदे यांनी राजुरी साठी स्वतंत्र वीज उपकेंद्र निर्मितीचे आश्वासन दिले. विज

उपकेंद्राला एक वर्षांपूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. परंतु राज्यातील सरकारच्या फेरबदल्यामुळे विलंब लागला होता. परंतु मामांनी मागील महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बैठकीत तालुक्यातील विज उपकेंद्रासाठी निधी मंजूर करून घेतला. एक वर्षांपूर्वीच मामांनी दिलेल्या आश्वासनाला कोणताही तडा ना जाऊ देता, त्यांच्या प्रयत्नामुळे राजुरी वीज उपकेंद्राला 3 कोटी 74 लाख रुपये निधी मंजूर झाल्यामुळे वीज उपकेंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मामा आमदार झाल्यापासून राजुरी गावातील ग्रामस्थ विजेच्या मागणीसाठी भेटत होते. राजुरी गाव शंभर टक्के बागायती

असल्यामुळे विजेची गरज जास्त भासत होती. ही गरज ओळखून मामांनी प्रयन्त केले. विजेच्या लपंडावामुळे हतबल झालेला आमचा शेतकरी यामुळे आनंदी झाला आहे. याकामी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, नंदकुमार जगताप, आर आर बापू साखरे, नवनाथ दुरंदे यांनी सततचा पाठपुरावा आमदारांकडे केल्यामुळेच कमी वेळेत सबस्टेशन चा प्रश्न सुटला. संपूर्ण राजुरी ग्रामस्थांनी मामांचे खूप खूप आभार व्यक्त केले.