
ज्योतिर्लिंग गणेश तरुण मित्र मंडळ कुंभेज च्या वतीने १५००० /- रुपयांची मदत
कुंभेज प्रतिनिधी
कुंभेज गावचे सुप्रसिद्ध मेकॅनिकल किशोर (पिंटू) कुंभार यांची कन्या बारामती या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरचा कोर्स करत

आहे. तिच्या शिक्षणासाठी मंडळाच्या वतीने फुल न फुलाची पाकळी मदत म्हणून १५०००/- रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष दशरथ मोरे, सचिव गणेश शिंदे सर, उपाध्यक्ष गजानन तोरमल, मार्गदर्शक अमोल मुटके, दशरथ शिंदे, इनुस

पठाण, संजय तोरमल, युवराज भोसले, बिटू तोरमल, नवनाथ तोरमल, नाना तोरमल, कुमार कादगे, गणेश पवळ, भाऊसाहेब रामदास वाघमारे समस्त मित्र मंडळ आदी उपस्थित होते.
