छत्रपती शिवाजी प्रशालेची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड.

करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी ता. करमाळा या प्रशालेच्या १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धी सोमवार,२५ रोजी जिल्हा क्रिडा संकुल कुमठा नाका, सोलापूर

येथे पार पडल्या. या संघाने सुरवातीला सांगोला, मोहोळ या संघाचा सलग पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम स्पर्धेत या संघाने बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर ता. मंगळवेढा या संघाचा २९ गुणांनी पराभव करत विभागीय स्पर्धेवर आपले नाव कोरले. सपना मासाळ, मयुरी गोरे, साक्षी देवकते, साक्षी गोरे, ऐश्र्वर्या गोरे, प्रज्ञा आदलिंगे, प्रगती वायदंडे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या संघाला क्रिडाशिक्षक बाळासाहेब भिसे ,कोच नवनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे

चेअरमन डॉ.महेश अभंग, सचिव अॅड.अनुप अभंग, मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण -शिंदे,शाळाध्यक्ष बापुसाहेब शिंदे व कोर्टी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.अनंत चतुर्थीच्या दिवशी ग्रामस्थांनी व पालकांनी विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार केला.विभागीय स्पर्धेसाठी या प्रशालेने हॅटट्रीक केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *