
करमाळा प्रतिनिधी
करमाळा डेपो हा नेहमीच प्रवाशांच्या असुविधेसाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो. करमाळा आगारास शासनाकडून कोट्यावधीचे अनुदान प्राप्त होते. मात्र मिळालेल्या अनुदानाचा योग्य वापर व नियोजन न झाल्याने शासनाचे पैसे मातीमोल होत

असल्याची भावना यावेळी प्रवाशांकडून व्यक्त होताना पाहायला मिळाली. डेपोतील प्रवाशांच्या आसनाच्या प्रत्येक ब्लॉक मध्ये फॅन बसविणेत आले आहेत. परंतु ९०% फॅन बंद होते. याबाबत आगारात चौकशी केली असता फॅन नादुरुस्त असल्याचे

सांगितले गेले. त्यामुळे एस. टी. ची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना घामाच्या धारांनी हैराण करून सोडले होते. तर ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा वावर दिसत असून प्रवाशी बसतात त्या ठिकाणी शेणाचे सडे पडलेले पाहायला मिळाले. एस.

टी. डेपो ला स्वच्छता ठेकेदार आहे का? किंवा स्वच्छतेसाठी डेपो चा कर्मचारी वर्ग आहे का? असा प्रश्न यानिमत्ताने उद्धभवत आहे. आगार व्यवस्थापक याकडे लक्ष देतील का? का अशाच नरकयातना प्रवाशांना सहन कराव्या लागतील. नागरीकांच्या सोयी सुविधांसाठी विविध संघटनांनी, राजकीय पक्षांनी आक्रमकपणे भूमिका मांडून नागरिकांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.