करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने यावर्षी चालवून ऊस उत्पादक कर्मचारी व ऊस वाहतूकदार यांना न्याय देणार आहे. भ्रष्टाचाराला फाटा देऊन सर्वसामान्यांचे हित जपण्याचे काम करू असा विश्वास आदिनाथच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रशासकीय अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी दिला. तब्बल तीन तास वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

या सभेत बोलताना प्राध्यापक सुहास गलांडे म्हणाले यापूर्वी वार्षिक सभेत तत्कालीन संचालक भाडोत्री गुंडाळून सभासदांना बोलू देत नव्हते. यावर्षी मात्र आमचा सारख्या सर्वसामान्य सभासदाला आमचे मत मांडण्यात संधी मिळाली. साखर निर्यात अनुदान घोटाळा प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नुकसान भरपाईची निश्चिती करावी असा ठराव आदिनाथ साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला.

आज 51 नवीन वार्षिक सर्वसाधारण सभा प्रशासकीय संचालक बाळासाहेब बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर प्रशासकीय सदस्य शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, डॉ. वसंत पुंडे, प्रा. रामदास झोळ, प्रा. सुहास गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संतोष खाटमोडे पाटील, प्रा. शिवाजीराव बंडगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कारखान्याची गाळप क्षमता 7500 मॅट्रिक टन करावी. पाच लाख लिटर स्लरी इथेनॉल प्रकल्प उभा करावा या ठरावाला मान्यता देण्यात आली. यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाला काटा पेमेंट देणे व ऊस वाहतूकदारांना रोजच्या रोज वाहतूक भाडे देणे.

कर्मचाऱ्यांच्या पगारी दर महिना करणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रशासकीय अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी सांगितले.

बोलताना संजय गुटाळ म्हणाले की, यावर्षी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अत्यंत कमी खर्चात कारखाना सुरू करत असून बाहेर देणारी जॉब वरची कामे कारखान्यातच कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे यावर्षी कारखान्याचा लाखो रुपये फायदा झाला आहे.

2020-21 मध्ये आदिनाथ कारखान्यात साखर शिल्लक नसताना आदिनाथ कारखान्याला मिळालेले निर्यात कोटा साखर व्यापाऱ्यांना विकण्यात आला. यातून आलेला पैसा गैरमार्गाने साखर निर्यात केल्याचे कमिशन म्हणून संबंधित व्यापाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.

42 लाख रुपये मकाई कारखान्याकडे वर्ग करण्यात आले. या व्यवहाराला केंद्र सरकारने आपण अनुदानाचा गैरवापर केला असं ठपका ठेवून आदिनाथ कारखान्याला अनुदान मिळवले. रक्कम तीन कोटी चाळीस लाख रुपये परत भरण्याचे आदेश दिले आहेत.

यासाठी कारखान्यात शिल्लक असलेली साडेपाच हजार कोटी साखर जप्त केली आहे. यामध्ये आदिनाथ कारखान्याची नुकसान झाले असून या नुकसानाची जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक वर ठेवावी अशी मागणी ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.

जानेवारी 2023 मध्ये भंगार विक्रीतून आलेली 65 लाख रुपयांच्या रकमेचा हिशोब सभासदांपुढे मांडण्याचे सांगण्यात आले कारण या काळात कारखाना बंद असताना हा पैसा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित काही सभासदांनी केला.

.‌‌…..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत या तिघांच्या अभिनंदन करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

प्रा. सुहास गलांडे

आदिनाथ कारखान्यावर सत्ता गाजवणाऱ्या लोकांनी आतील आदिनाथ उपभोग वस्तू म्हणून वापर केला यामुळे आदिनाथ रसातला गेला. आता प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता काम करण्याचं सर्व सभासदासमोर सांगितले आहे. यामुळे हा कारखाना गत वैभव प्राप्त करेल विश्वास आहे. महेश चिवटे चळवळीतील कार्यकर्ते असून बचाव समितीच्या माध्यमातून कारखान्याचे खाजगीकरण रोखण्याची त्यांनी काम केले आहे. आता जुना कारखान्यातील भ्रष्टाचार सुद्धा त्यांनी बाहेर काढावा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *