करमाळा प्रतिनिधी

निंभोरे हे गाव समृध्दीने नटलेले गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी एकोप्याने राहतात. त्यातच मुस्लिम बांधवांचा सुद्धा प्रत्येक सामाजिक कामात सहभाग असतो.

विशेष म्हणजे इतर ठिकाणी गणेश मंडळामध्ये एखाद-दुसरा मुस्लिम कार्यकर्ता असतो. मात्र निंभोरे येथील मुस्लिम बालगणेश भक्तांनी एकत्र येत एक स्वतंत्र “श्री बालगणेश मित्र मंडळ निंभोरे” या नावाने गणेश मंडळ स्थापन केले. या मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे.

     जुबेर पठाण, मुस्थपा मुलाणी,रियाज पठाण,रेहान पठाण,समीर नजीर पठाण,सोहेल पठाण,समीर युसब पठाण या बालगणेश भक्तांनी मंडळाची स्थापना केली.

     अगदी पारंपरिक पद्धतीने खूप छान असा देखावा करत या मुस्लिम बालगणेश भक्तांनी अगदी भक्ती भावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

     श्री गणेशाची आरती मंडळाने सामाजिक युवा कार्यकर्ते रविदादा वळेकर यांच्या हस्ते केली. रविदादा वळेकर यांनी मंडळाला प्रोत्साहन पर मदत केली व इथून पुढं असच कार्य तुमच्या मंडळाच्या हातून घडू द्या यासाठी शुभेच्छा दिल्या.

   यावेळी आर.व्ही ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मस्के, दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर, सोमा गुरव, भैरू सांगडे, दादा पठाण, पप्पू पठाण तसेच मंडळाचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते. सर्वांनी मंडळाचे कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *