करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील शाहूनगर या विभागातील गणेश भक्तांनी या महागाईच्या दुनियेत पेट्रोलचे दर कमी व्हावेत म्हणून गणपती बाप्पाकडे दर कमी करण्याचे साकडे घातले आहे. करमाळा शहरातील शाहूनगर येथील रहिवासी प्रा.दिलीप थोरवे व

त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज थोरवे या पिता-पुत्राने चक्क गणपती विसर्जनाच्या वेळी पेट्रोल पंपावरून गणपती बाप्पांची मिरवणूक काढली. ज्याप्रमाणे गावाला जाताना गाडीत पेट्रोल भरून जावे लागते त्याप्रमाणे गणपती बाप्पांना सुद्धा पंपावर

जाऊन जावे लागले. यावेळी त्यांनी या महागाईच्या काळात पेट्रोलचे दर कमी होऊन सर्वसामान्य जनतेला अभय मिळावा असे गणपती बाप्पाकडे पेट्रोलचे दर कमी व्हावे म्हणून साकडे घातले. याप्रसंगी प्रा. पी.एस. कुदळे लहान गणेशभक्त माधूरी कुदळे,.मधूरा बागल उपस्थित होते .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *