
जेऊर प्रतिनिधी
दिनांक २४ ते २६ सप्टेंबर कोल्हापूर पेठ वडगाव येथे झालेल्या हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा हँडबॉल असोसिएशन कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हँडबॉल पंच परीक्षा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.

या पंच परिक्षेत जेऊर येथील नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चे सचिव विनोद गरड हे उत्तीर्ण झाले आहेत. राज्यस्तरीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होणारे करमाळा तालुक्यातील एकमेव राज्यस्तरीय पंच म्हणून निवड झाली आहे. या

निवडी बद्धल मा. आ. नारायण आबा पाटील, सभापती अतुल भाऊ पाटील, पृथ्वीराज भैय्या पाटील, मा. सरपंच भास्कर भाऊ कांडेकर, मा. सरपंच अनिल कुमार गादीया, मा. उपसरपंच धनु शिरस्कर, मा. उपसपंच राजू जगताप, नूतन हँडबॉल

असोसिएशन चे अध्यक्ष संतोष नुस्ते, यांनी अभिनंदन केले तर सोलपूर शहर व जिल्हा हँडबॉल असोसिएशन चे प्रा. आंनद चव्हाण, सुदेश मालप यांनी मार्गदशन केले.