करमाळा प्रतिनिधी

मांगी तलाव कुकडी लाभ क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी आज पर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याने पाठपुरावा केला नाही. आज मांगी तलाव कुकडी लाभ क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन महा स्वाक्षरी अभियान राबवले व याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माढा लोकसभेचे खासदार

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करून हे काम मार्गी लावले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कुकडी फेरजल नियोजनामध्ये मांगी तलावाचा समावेश करणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

हे काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून हे काम येणाऱ्या काळात पूर्ण होईल, मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याचे फुकटचे श्रेय कोणिही घेऊ नये या कामाचे श्रेय भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊंनाच जाते असे मत मांगी गावचे प्रगतशील शेतकरी किरण बागल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चौकट

मांगी तलाव कुकडी लाभ क्षेत्रात  समाविष्ट करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी या भागातील शेतकऱ्यांची  स्वाक्षरी मोहीम राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला व हे काम पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.  

विठ्ठलराव शिंदे – प्रगतशील शेतकरी, पोथरे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *