करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद सेस निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी 50% व 75% अनुदानित कृषी औजारासाठी अर्ज करावेत असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती

देताना ते म्हणाले की, सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्हा परिषद सेस फंडातून अनुदानवर कृषी औजारे उपकणे, यंत्र वाटप करण्यात येणार आहे. यानुसार सर्वसाधारण शेतकऱ्यांना 50% अनुदानवर औजारे मिळणार आहेत तसेच

महिला व दिव्यांग शेतकऱ्यांसाठी 75% अनुदान उपलब्ध होणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पिक संरक्षण औजारे – थ्री पिस्टन स्प्रेपंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रशकटर, सोलार इन्सेक्ट ट्रॅप कृषि अभियांत्रिकी योजना – रोटाव्हेटर / पॉवर टिलर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, कल्टीव्हेटर इ.

कृषि सिंचनासाठी सुधारीत औजारे व साधने पुरविणे – ५/७.५ एच.पी. विद्युत ओपनवेल सबमर्सिबल पंपसंच, ४/५ एच.पी. डिझेल इंजिन / तुषार सिंचन व सुधारीत औजारे साहित्य पुरवठा करणे कडबाकुट्टी ताडपत्री, स्लरी फिल्टर आदी औजारे

इत्यादी कृषी औजारे मिळणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज पंचायत समिती करमाळा यांचेकडे करावेत. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी भाजपा संपर्क कार्यालय, गायकवाड चौक, करमाळा येथे संपर्क करावा असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *