करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा फुले या महापुरुषांबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप व युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बहुसंख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत करमाळा पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय करमाळा येथे सदरचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये वादग्रस्त वक्तव्यासाठी आणि अजब व तर्कट स्वभावासाठी कुप्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, केंद्र सरकारला सध्या देशात वाढलेली महागाई, महीलावरील वाढते अत्याचार, मणिपूरची घडलेली घटना या विषयांवरुन विरोधकांनी धारेवर धरले आहे. या विषयांवरुन देशवासीयांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भिडे यांचा प्रयत्न सुरु आहे.

त्यामुळे मनुवादी विचारांच्या भिडेकडुन सदरची वक्तव्य करण्यास भाग पाडल्याचे दिसून येत आहेत. पण ते करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच देशातील जनतेचा आदरस्थान असलेल्या महापुरुषांच्या नावांचा वापर करणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबत त्यांनी केलेली वक्तव्य हे निंदनीय असून अशा प्रवृत्तीचा वेळीच थांबवणे गरजेचे आहे. असे नाही झाले तर सामाजिक शांततेचा भंग होऊन समाजात तेढ निर्माण होवु शकते अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रताप जगताप व संभाजी शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे. भिडे यांच्यावर कारवाई करीत असताना कलम १५३ अंतर्गत लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी सदर निवेदनावर ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष युवक सुजय जगताप, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण, तालुका सचिव जैनुदीन शेख, किसान सेलचे तालुका अध्यक्ष दादासाहेब कुदळे, तालुका उपाध्यक्ष छगन मोहोळकर, महबूब शेख, बाबुराव एकाड, संभाजी शिंदे, नितीन चिंचकर, ओ.बी.सी.सेल चे उपाध्यक्ष, भगवान डोंबाळे, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, रमजाण मुलाणी विष्णू वाघमोडे, मधुकर टापरे, दीपक ननवरे, नितीन चोपडे,  वसंत भिसे, निकेश चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *