
वाशिंबे प्रतिनिधी
कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर पदावर कार्यरत असलेले बापू भारत भडंगे यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. पोमलवाडी ता.करमाळा येथील विकास बागल हे कोर्टी आरोग्य केंद्रात श्वानदंश वरील लस घेण्यासाठी आले

असता त्यांच्याकडील 25 हजार रुपयांचा मोबाईल फोन व 6 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज ते नकळतपणे आरोग्य केंद्रात विसरून गेले. ही बाब निदर्शनास आली असता आरोग्य परिचर बापू भडंगे यांनी आरोग्य केंद्रातील वरिष्ठांना माहिती

देऊन ऐवज सुरक्षित ठेवला. सदर व्यक्तीचा फोन आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलावून त्यांना रोख रक्कम व मोबाईल सुपूर्द केला. यावेळी बागल यांनी भडंगे यांचे आभार मानले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भडंगे यांचा

प्रामाणिकपणा पाहून वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत येवगे, आरोग्य सहाय्यक शिवाजी तांदळे, कनिष्ठ लिपिक जगन्नाथ भिसे, आरोग्य सेवक सुरेश गायकवाड, परिचर सुभाष जायभाय यांनी बापू भडंगे यांच्या प्रामाणिकपणा बदल सत्कार केला.

