
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे दि.29 रोजी सकाळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा शिवसेना

प्रमुख महेश चिवटे, करमाळा नायब तहसीलदार विकास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमा चे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले. यावेळी करमाळा पोलीस सटेशनचे पि.आय.ज्योतिराम

गुंजवटे, उप अभियंता सा.बां.वि. उबाळे साहेब, अनिल चव्हाण, नाशिर कबिर, दिलिप आहिरे, बाळासाहेब कोकाटे, केरु गव्हाणे, थोरात गुरुजी, दिनकर सरडे, महादेव कामटे, विनोद सरडे, बापूराव सरडे , युनिस सय्यद, सागर पोरे, कैलास बोंद्रे, गणेश

कानगुडे, हेमंत बारकुंड, डाॅ.अक्षय गव्हाणे, नागेश चेंजगे व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात चिखलठाण, जेऊर, केडगाव, कुगाव, दहिगाव, शेटफळ नागोबाचे, पोफळज येथील हजारो महिला व पुरुष रुग्न यांनी सहभाग नोंदविला उत्कृष्ट

सूत्रसंचालन केल्याबद्दल लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा यांचा सन्मान सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. आयोजन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष

राजेंद्र बारकुंड, चिखलठाण सोसायटी चे चेअरमन विकास गलांडे, जानता राजा मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ चिखलठाण यांनी केले.