करमाळा प्रतिनिधी

कंदर, ता. करमाळा येथील आमचे मार्गदर्शक मित्र, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय व विद्यमान आमदार किशोरजी जोरगेवार यांचे स्वीय सहायक आणि संवेदनशील पत्रकार गणेश जगताप यांनी यशकल्याणी परिवाराच्या

सामाजिक क्षेत्रातील सेवेची दखल घेत भारताची अस्मिता असलेला राष्ट्रध्वज व माझा फोटो छापलेली डायरी मला आमदार किशोरजी जोरगेवार यांच्या प्रेरणेतून सप्रेम सस्नेह भेट दिली, विशेष म्हणजे हे सर्व बांबूपासून बनवलेले आहे, तेथील

पर्यटनाची व प्रदेशाची अस्मिता आहे, लोकसंस्कृतीचे प्रतिक आहे, निसर्गाचे वरदान आहे,  ऐतिहासिक ठेवा आहे. या अमूल्य व अभूतपूर्व सन्मानाबद्दल त्यांचे व आमदार साहेबांचे यशकल्याणी परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक आभार व मनापासून धन्यवाद..!

आपण केलेला हा अनोखा सन्मान व भेटवस्तु हि यशकल्याणी परिवाराच्या पुढील सेवाकार्यास प्रेरणेचा दिपस्तंभ म्हणून तेवत राहिल..!

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *