करमाळा प्रतिनिधी

 करमाळा नगर परिषद करमाळा हद्द शहरातील विविध भागातील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याबाबत मा.मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते उडावा उडवी उत्तर देतात. पाणीपुरवठा विभागात चौकशी करत असता एकमेकांकडे बोट दाखवत खोटी माहिती दिली जाते. तसेच एखादा नागरीक चौकशी करिता गेला असता त्यास चेष्ठेच्या स्वरुपात उत्तरे दिली जातात.

यापूर्वी दि. 17/2/2023 रोजी करमाळा नगर परिषद येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने आम्ही उपोषणही केले होते. त्यानंतर त्यांच्याकडून लेखी स्वरुपात आश्वासन दिले होते की, शहरातील सर्व प्रकारच्या समस्या सोडवणूक करू. परंतु कालांतराने या निर्देशित गोष्टींचा विचार केला गेला नाही. त्यामुळे जनतेच्या मनात प्रशासनाविरोधात  रोष निर्माण झाला आहे. त्या रोषाचा उद्रेक होऊन नगर परिषद अधिकारी यांच्यावर कारवाई होऊ शकते.

आपण या प्रकरणी लक्ष घालून सदर मुलभूत गरज पूर्ण करण्यास त्यांना आदेशित करण्यात यावे. अन्यथा करमाळा  नगर परिषदेच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यासाठी आंदोलन केले जाईल. त्याचबरोबर नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारक व हातगाडे व्यवसायिक यांच्यावर जबरदस्तीने अव्वाच्या सव्वा नगर परिषद ठेकेदारामार्फत कर वसुली दहा रुपयांऐवजी  50 ते

60 रु. दादागिरी करुन करत आहेत. मुख्याधिकारी  साहेबांना याबाबत कळविले असता ते याकडे पाठ फिरवत आहेत. मनात अशी शंका येते की मुख्याधिकारी हे ठेकेदाराकडून आर्थिक व्यवहारांतून तडजोडीत आहेत अशा नागरीकांमध्ये चर्चा आहेत. त्याचीदेखील चौकशी व्हावी.  तरी आपणांस विनंती की आपण याकडे वैयक्तिक लक्ष देऊन सदर गोष्टींबाबत लवकरात लवकर निर्णय करावा.

सोबत यांना मुख्याधिकारी, करमाळा नगर परिषद करमाळा, प्रांत अधिकारी, माढा डिव्हीजन कुर्डुवाडी निवेदन दिले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *