करमाळा तालुक्यात भाजपा व कृषी विभागामार्फत पीएम किसान संमेलन कार्यक्रम विविध ठिकाणी साजरा
करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘पीएम किसान’ योजनेच्या 14 व्या हप्त्याचे
वितरण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज दोन हजार रुपये जमा केले. यावेळी प्रधानमंत्री महोदयांनी राजस्थान येथील सिकर येथे किसान संमेलनात (शेतकरी महामेळाव्यात) शेतकऱ्यांशी संवाद साधत दोन हजार रुपये जमा केले. हे किसान संमेलन देशभरात सर्व कृषी केंद्रावर घेण्यात आले. यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा तालुक्यात कृषी विभाग व भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कृषी केंद्रावर आयोजित करण्यात आला होता, हा कार्यक्रम पाहण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कृषी विभागामार्फत प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक, कृषी
अधिकारी उपस्थित होते, तसेच प्रत्येक कृषी केंद्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थान येथील कार्यक्रम शेतकऱ्यांना एल.इ.डी स्क्रीन वर दाखवण्यात आला. करमाळा तालुक्यातील विजय ऍग्रो एजन्सी या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पाहिला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.