करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण दुरुस्तीची कामे हाती घ्या. अन्यथा संपूर्ण तालुकाभर रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन करण्यात येईल, सतिष नीळ यांनी दिला इशारा.

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेक गावांना तालुक्याला जोडणाऱा डांबरी रस्ताच राहीला नसुन रस्त्या वरील डांबर निघून गेले आहे. अनेक ठिकाणी फक्त मातीचे रस्ते व गुडघ्याऐवढे खड्डे झाले

आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने दुरुस्ती करणे आवश्यक होते. सद्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचून राहील्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा करमाळा तालुक्यातील नागरीकांच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी दिला आहे.

यावेळी नीळ यांनी बोलताना सांगितले की, करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते केतूर,सावडी फाटा ते केतूर, वाशिंबे चौफूला ते राजुरी, दिव्हेगव्हान ते कुंभारगाव,पूर्व सोगाव-ऊमरड,कुगाव -चिखलठाण-शेटफळ,वाशिंबे ते सोगाव ते राजुरी,राजूरी ते

पोंधवडी, फिसरे ते हिवरे, कोळगाव, गौंडरे ते नेरले,साडे ते सौंदे (गुळसडी मार्ग)ते करमाळा,बिटरगाव, तरडगाव पर्यंतचा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरून प्रवास करताना शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यात संततधार पावसामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेत वाढ झाली आहे.

त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवून आवश्यक ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. परंतू वारंवार मागणी करुनही बांधकाम विभागाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *