55 हजार शिक्षक भरती एकाच टप्प्यात करा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना यशपाल कांबळे यांचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात एकूण 2 लाख 16 हजार विद्यार्थ्यांची दि. 21 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये परीक्षा दिली होती. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 67 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

औरंगाबाद खंडपीठाने 80 टक्के शिक्षक भरती करण्याकरिता मान्यता दिली आहे. त्यास आपल्या वित्त विभागाने देखील परवानगी दिलेली आहे. आपण शिक्षक भरतीची परीक्षा एकाच टप्प्यात घेतली आहे. मग शिक्षक भरती दोन टप्प्यात का?

असा आमचा सवाल आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता आपण जी दोन टप्प्यात होणारी पद भरती एकाच टप्प्यात घेतली पाहिजेल जर आपण पदभरती दोन टप्प्यात घेतली तर तीस हजार पद भरती होईल पण 25000 विद्यार्थी हे आपल्या

अटीमध्ये बसणार नाहीत. त्यानंतर त्यांचे वय निघून जाईल त्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्यायं उरणार नाही म्हणून आपण योग्य वेळी योग्य निर्णय उचलत योग्य तो निर्णय घ्यावा.

घ्यावाच म्हणण्यापेक्षा घेतलाच पाहिजेल, ही नम्र विनंती. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

आपण ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करचाल असे निवेदनात म्हंटलेले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे. मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *