मोफत मुत्रविकार तपासणी व मोफत ऑपरेशन शिबिर नागरिकांनी लाभ घ्यावा
करमाळा ता प्रतिनिधी
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व स्व. अश्रु बापु जाधव यांच्या जन्मदिवस निमित्ताने करमाळा तालुका शिवसेना, युवा सेना व शिव आरोग्य सेना (उद्धव ठाकरे) यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोफत मुत्र
विकार उपचार व मोफत ऑपरेशन शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी रघोजी किडनी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मुंबई येथील डॉक्टर यांचे सहकार्य लाभणार आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोफत मूत्रविकार तपासणी, मोफत मुतखडा, प्रोस्टेट यांची शस्त्रक्रिया, मूत्रविकार संबंधित आजारावर तपासणी उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत .
हे शिबीर करमाळा शहरातील डॉ. उमेश जाधव यांच्या रेवती हॉस्पिटल, मेनरोड सुतार गल्ली येथे दि. 02-6-23 रोजी सकाळी 10 वा. पासून तरी इच्छुकांनी संपर्क साधावा, असे शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी आव्हान केले आहे.