करमाळा प्रतिनिधी

तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी मानवतेची शिकवण देऊन आत्मनिर्भ‌र जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या नरेंद्र महाराजांच्या स्व स्वरूप सांप्रदायाचे कार्य अनुकरणीय असल्याचे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी केले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा सेवा केंद्राचे अध्यक्ष नरेशकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त

सामाजिक उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील दोन लाभार्थ्यांना आत्मनिर्भर स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप मिलिंद फंड सर यांच्या हस्ते करण्यात आले. नरेशकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका सेवा समिती यांच्यावतीने केक कापून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नरेश माने यांची गुरूभक्ती श्रेष्ठ असून संसारिक जीवनामध्ये आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडून पादुका दर्शन सोहळ्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम केलेली सेवा नक्कीच गुरुचरणी पोहचली असून त्याचे फळ त्यांना जीवनामध्ये नक्कीच मिळेल असा विश्वासही करमाळा तालुका सेवा समिती भक्तमंडळींनी सेवा करताना व्यक्त केला आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, परोपकार करून दुसऱ्याचे जीवन सुखी संपन्न‌ करण्यासाठी दानाचे महत्त्व आध्यात्मिक कार्याद्वारे करून खऱ्या अर्थाने लोक कल्याणीचे काम हा सांप्रदाय करत असल्याने या संप्रदायाचे भविष्य उज्वल असुन धर्म कार्यासाठी आपण यामध्ये सहभागी होऊन पाठबळ देणार असल्याचे प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी सांगितले.            

या कार्यक्रमास नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले, माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, नंदकिशोर सरडे, आण्णासाहेब क्षिरसागर, बाबासाहेब क्षिरसागर, विशेष कार्यवाह संतोष हंडाळ, भाऊसाहेब पाटील, रोहन शिंदे, विकास शिंदे, नवनाथ भोसले,राहुल शिंदे, शिवाजी मारकड, प्रकाश जाधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *