कै नामदेवरावजी जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त फॉरेस्ट मध्ये मुक्या प्राण्यांसाठी व पशू पक्षांसाठी पिण्याचे पाणी
करमाळा प्रतिनिधी – भर उन्हात रानोमाळ फिरणाऱ्या मुक्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन एक प्रकारे फार मोठी पुण्याई व एक स्तुत्य असा सामाजिक उपक्रम आमचे सहकारी व मित्र चिंतामणी दादा व त्यांच्या बंधूंनी आज सुरू केला आहे. ही निश्चितपणे कौतुकास्पद गोष्ट असल्याची प्रतिपादन मकाई कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज करमाळा येथे कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर उपस्थित होते. आज करमाळा येथे तालुक्याचे माजी आमदार देशभक्त कै नामदेवरावजी जगताप यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त करमाळा येथील फॉरेस्ट मध्ये मुक्या प्राण्यांसाठी व पशू पक्षांसाठी तीव्र उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन तयार केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचे पूजन मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभिक कै नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते करण्यात येऊन उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरांजली वाहिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्केट कमिटीचे उपसभापती चिंतामणीदादा जगताप यांनी केले. तर स्वागत माजी नगरसेवक राहुलभैया जगताप व काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर, वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, आदिनाथ चे माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे, प्राध्यापक शहाजीराव देशमुख सर ,केतुर चे माजी युवा सरपंच उदयसिंह तथा धनी साहेब मोरे पाटील ,कल्याण सरडे सर ,आदिनाथ चे माजी संचालक दिनेश भांडवलकर, प्राचार्य मिलिंद फंड सर, मार्केट कमिटीचे संचालक देवानंद ढेरे ,नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड ,विजयराव पवार ,अक्षय सरडे ,कंदरचे सुभाष पवार ,निमगावचे सतीश निळ ,अनिल मामा शिंदे, मुगाजीराव येवले, अरुण घाडगे ,भाऊसाहेब विजयकुमार निपसे, विजय दादा साळुंखे सोलापूर येथून आवर्जून उपस्थित असलेले अजयकुमार दासरी प्रभाकर शिंदे यांच्यासह शेकडो मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते. यानंतर सर्व मान्यवरांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कैलासवासी नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी आदरणीय साहेबांचे अनेक जुने जाणते अनुभवी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पृथ्वीराज भैय्या जगताप विश्वराज जगताप अथर्व फाटके आर्यनराजे फाटके, रणविजय जगताप या सर्व युवा टीमने यशस्वीपणे केले हो

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *