करमाळा प्रतिनिधी

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही घरांचे व शेतीचे नुकसान झाले प्रशासनाने त्याचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळवून द्यावी

अशिष अण्णा गायकवाड, मा.सरपंच देवळाली

आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे देवळाली परिसरातील काही घरावरील पत्रे उडाले व शेतीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये केळी,ऊस आंबा,लिंबू यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले त्याचबरोबर देवळाली गावातील श्री मारूती शंकर बिचितकर यांची झाड पडून गाई दगावली सदर नुकसानीची दखल मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी घेतली व लगेच प्रशासनाला फोन वरून संपर्क साधला व सदर नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे असे सांगितले त्याचबरोबर मा.सरपंच यांनी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री संजयमामा शिंदे यांना संपर्क साधला त्यांनीही प्रशासनाला आदेशित केले त्यानंतर मा.तहसीलदार श्री विजयकुमार जाधव साहेब यांनी मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेबव कृषी सहायक यांना सदर नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले संबंधित घटनेचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी दिला

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *