
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना वारंवार लेखी स्वरूपात निवडणूक प्रक्रिया बाबत सुचना करूनही त्यांनी काहीच केले नाही म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. अशी माहिती प्रादेशिक सह संचालक साखर विभागाचे राजेंद्रकुमार श्रीरंग दराडे यांनी दिली आहे.

दराडे साहेब म्हणाले कि, साखर कारखान्याची मुदत संपुन गेली होती जुन महिन्याच्या आगोदर निवडणूक होयला हवी होती. याबाबत आम्ही संबंधित यांना सुचना केलेल्या होत्या. त्यांनी फक्त दहा लाख रूपये रक्कम भरली होती राहीलेली रक्कम भरण्यासाठी सुचना केली होती, परंतु आम्ही भरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. म्हणून आज प्राधिकरण विभागाचे

बेंद्रे यांची तेथे नेमणूक आम्ही केली आहे. लवकरच आता आदिनाथ कारखाना बाबतचे पुढील सर्व प्रोसेसचे नियोजन आम्ही करून आपणांस योग्य ती माहिती देवो, असेही अखेर प्रादेशिक सह संचालक साखर विभागाचे राजेंद्रकुमार दराडे यांनी सांगितले आहे.

…..
संचालक बोर्डाच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे आदिनाथचा बळी गेला असल्याची माहिती बारामती अँग्रोचे व्हा. चेअरमन सुभाष गुळवे यांनी दिली आहे.
आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक बोर्डाने वेळीच साखर विकून योग्य ती रक्कम भरायला हवी होती, परंतु टक्केवारीसाठी यांनी साखर विकली नाही, रक्कम न भरल्यामुळे प्रशासक नेमण्यात आले आहे, हे सर्व तालुक्याला माहित आहे, बँकेचे हप्तेही थकले आहेत आता तिसरा हप्ता थकल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पाच अशी परिस्थिती होणार आहे. आदिनाथ हे शेतकऱ्यांचे मंदिर आहे या मंदिरलाच पोखरण्याचं काम या संचालक मंडळांनी केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्याकडे कारखाना दिला असता योग्य दर शेतकऱ्यांना मिळाला असता सत्ताधारी मंडळी राजकारण करीत आहे, यामुळे कारखाना अडचणीत येत आहे, सभासदांनी वेळीच आता यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे अखेर गुळवे यांनी सांगितले आहे.

……….
यासंदर्भात कार्यकारी संचालक बागनवर यांना फोन लावला असता ते म्हणाले, याबाबत आपणास नंतर सांगतो.
…..
आम्ही पहिले दहा लाख रुपये भरले होते आज कारखाना स्थळावर संचालक मंडळाची मिटिंग घेऊन साखर विक्री करून पुढील रक्कम भरण्याचे नियोजन करणार होतो, परंतु अचानक प्रशासक अधिकारी आल्यामुळे अडचण आली आहे- धनंजय डोंगरे चेअरमन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा

……
वारंवार सत्ताधारी गटाचे चेअरमन नेते मंडळी यांना आम्ही सांगत होतो. निवडणूक संदर्भातील पैसे साखर विकुन भरा परंतु हे मंडळी कानाडोळा करीत होती, हे कशामुळे……. यामुळे कारखान्याचे शेतकरी सभासदांचे नुकसान त्यांनी केले आहे. अखेर यांच्यामुळेच प्रशासकांची नेमणूक झाली आहे – रमेश कांबळे, व्हा. चेअरमन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा
