महाराष्ट्र दिनी शेतकऱ्याचा आत्मदहन करण्याचा इशारा ट्रॅक्टर फसवणूक साडेसात लाख मातीत

केम प्रतिनिधी

केम तालुका करमाळा येथील शेतकरी विकास लक्ष्मण जाधव यांना एक ट्रॅक्टर शोरूमने खराब ट्रॅक्टर देऊन सुमारे साडेसात  लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी टेंभुर्णी तालुका माढा येथील श्रीराम शोरूम समोर भर उन्हात कुटुंबासह दोन दिवस झाले उपोषणास बसले आहेत, जर भरपाई न मिळाल्यास  मे महाराष्ट्र दिनीं आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

केम येथील शेतकरी विकास लक्ष्मण जाधव याने मोल मजुरी करून त्यानी ३० जुलै रोजी टेंभूर्णी येथील श्री राम    आॅटोलाइन शोरूममधुन ९५५ नावाचा ट्रॅक्टर खरेदी केला होता.  एका महिन्यांत इंजिनचे काम निघाले. जाधव यांनी तो ट्रॅक्टर शोरूममध्ये घेऊन गेले शोरूम वाल्याने त्याचे इंजिन चे काम करून दिले. त्यानंतर तो ट्रॅक्टर २७ जानेवारी रोजी रात्री

अचानक पेट घेतला आणी इंजिन जळून खाक झाले. शोरूमवाल्याने  ट्रॅक्टर चे पासींग करून दिले नाहि त्यामुळे इन्सूरस कडे क्लेम लावता आला नाही. जाधव यांनी हा ट्रॅक्टर शोरूममध्ये घेऊन गेले  व आम्हाला दुसरा नवीन ट्रॅक्टर द्या अशी मागणी केली पंरूतु, शोरूमवाल्याने याची दखल घेतली नाही व  उलट उत्तरे त्यांच्याकडून ऐकायला मिळाली त्यामुळे त्या शेतकऱ्याने

२४ एप्रिल पासून शोरूम समोर कुटूंबासहित  कडक उन्हाळा असतानाहि उपोषण सुरू केले आहे. या मध्ये पत्नी, लहान मुलगा व चुलते असा परिवार बसला आहे.  जर १ मे महाराष्ट्र दिना पर्यंत जर नवीन ट्रॅक्टर किंवा भरपाई न मिळाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी या शोरूम समोर  कुटूंबासह पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याची पत्र मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री,पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाटवली आहेत.

चौकट

मला माझा जळालेला ट्रॅक्टर च्या  बदल्यात नवीन ट्रॅक्टर मिळावा किंवा मी भरलेले दोन लाख रूपये आणी भरलेला हप्ता तसेच ट्रॅक्टर वर असलेले कर्ज नील करून मिळावे अन्यथा मी माझ्या पत्नी लहान मुल कुटूंबासोबत १ मे महाराष्ट्र दिनी शोरूमसमोर आत्मदहन करणार.

विकास लक्ष्मण जाधव (शेतकरी) केम

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *