
करमाळा अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
प्रशासक पदी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी
करमाळा प्रतिनिधी
दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक मंडळ रिझर्व बँकेने बरखास्त केले आहे. अर्बन बँकेच्या प्रशासक पदी सरकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक दिलीप रंगनाथ तिजोरे यांची नियुक्ती केली आहे.

करमाळा शहरातील व्यापाऱ्यांच्या आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या दि करमाळा अर्बन बँकेचे 31 मार्च, 2022 अखेर रिझर्व बँकेच्या पथकाने तपासणी केली. त्यानुसार तपासणीत बँकेचे आर्थिक स्थिती तीव्र खालावल्याचे रिझर्व बँकेने केलेल्या तपासणीत आढळून आले. त्याशिवाय बँकेच्या कामकाजात गंभीर उल्लंघन व अनियमितता आढळून आल्याने, त्यास

संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात येऊन, बँकेचे विद्यमान संचालक मंडळ रिझर्व बँकेने बरखास्त केले आहे. रिझर्व बँकेचे उपमहाव्यवस्थापक एम. सरवणन यांनी लेखी पत्राद्वारे भारतीय रिझर्व बँक कलम 36 एएए अंतर्गत प्रदान केलेले अधिकाराचा वापर करत, 20 एप्रिल पासून अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली आहे.

अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नुकत्याच फेब्रुवारी, 2023 मध्ये पार पडल्या होत्या. बँकेच्या चेअरमनपदी कन्हैय्यालाल देवी यांची निवड झालेली होती. यापूर्वी गेले वर्षभरापासून अर्बन बँकेवर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध लादलेले होते. यामुळे बँकेचा व्यवहार ठप्प झाला होता. आता रिझर्व बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
अर्बन बँकेच्या प्रशासक पदाचा पदभार आपण स्वीकारलेला असून, रिझर्व बँकेच्या नियम, अटी व मार्गदर्शक सूचनानुसार बँकेचे कामकाज करू – दिलीप रंगनाथ तिजोरे प्रशासक
चौकट
करमाळा अर्बन बँक प्लस मध्ये आहे. सर्व आम्ही व्यवस्थित केले होते, कोरोना मध्ये वसुली करता येत नव्हती, छोट्या तृटी आहे, आरबीआयने आक्षेप घेतले आहे. आमचा पत्र व्यवहार चालू आहे, लवकरच मार्ग निघेल- कन्हैयालाल देवी चेअरमन अर्बन बँक, करमाळा